▪एनटी (ड) प्रवर्गातून बीड जिल्ह्याचा 'हिरा' चमकला.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर, कष्ट,परिश्रम घेत प्रचंड मेहनत करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या 2018 च्या 'पोलीस उपनिरीक्षक' पदाच्या परीक्षेत दिलीप विलास सोनवणे या जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांने उत्कृष्ट गुण घेत राज्यात एनटी (ड) प्रवर्गातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याच्या या यशाने बीड जिल्हावासीयांची मान राज्याच्या नकाशावर उंचावली आहे.
दिलीप विलास सोनवणे हा विद्यार्थी बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील बाभळगाव या छोट्याशा गावातील रहिवाशी असून तो येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी आहे. पुढे त्याने पदवीचे शिक्षण घेऊन त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी पुणे या ठिकाणी केली. त्यासाठी त्याने स्वतः प्रचंड मेहनत, कष्ट घेत जिद्दीच्या बळावर भटक्या जमाती (ड)या प्रवर्गातून राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला... बाभळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत अत्यंत कठीण परिस्थितीतून त्याने प्राथमिक शिक्षण घेऊन तो या यशापर्यंत पोहोचला आहे.
मुळातच अभ्यासू असलेल्या दिलीप याने घरच्या सर्वसामान्य नाजूक परिस्थितीवर मात करत 'फौजदार' परीक्षेत यश संपादन केले; या यशाबद्दल त्याच्या छोट्याशा बाभळगावात गावकर्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या दिलीप विलास सोनवणे यांची 'पोलीस उपनिरीक्षक' पदी निवड झाल्याबद्दल परळी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रा. डॉ.बिभीषण फड, सीआयडी पोलिस अधीक्षक लता फड, डॉ. सूर्यकांत मुंडे, वडील विलास मुकुंदराव सोनवणे, आई उषा विलास सोनवणे,सचिन सोनवणे, नितीन सोनवणे, महादेव फड, गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, दीपक तांदळे, साहेबराव फड, प्रा.बिभिषण चाटे, प्रा.आशा चाटे, तंत्रस्नेही शिक्षक प्रदीप चाटे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
+ -----------------
" दिलीप हा लहानपणापासूनच जिद्दी चंचल अभ्यासू व प्रामाणिक विद्यार्थी होता प्रत्येक विषय समजून घेऊन त्यानंतर विस्तृत वाचन करून व्यापक विविध क्षेत्रातील ज्ञान घेण्याकडे त्यांचा 'कल' होता. फौजदार परीक्षेत यशस्वी होऊन त्याने आमच्या सर्वांचा आनंद द्विगुणीत केला आहे !"
बिभीषण फड
(मामा तथा मा. उपसभापती पं.स.परळी)
No comments:
Post a Comment