Thursday, March 5, 2020

परळीत आज धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांतून कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पूर्व तपासणी शिबिराचे आज उद्घाटन- डॉ.संतोष मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातुन 25 हजार रुपये किंमतीच्या मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पुर्वतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. 6 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता विजय कान्हेकर व डॉ. अशोक थोरात यांच्या हस्ते शिबिराचे शुभारंभ करण्यात येणार आहे. तरी परळी तालुक्यातील व शहरातील  कमी ऐकू येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व कर्नबधिर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिबिर संपर्क राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे
          धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांतून कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पूर्व तपासणी शिबिराचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे विजय कान्हेकर तर बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शिवकन्या शिवाजीराव सिरसाट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, राष्ट्रीय डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ नरेंद्र काळे, परळी न.प.चे नगराध्यक्ष सौ.सरोजनीताई  सोमनाअप्पा हालगे, न.प.गटनेते वाल्मिक कराड,  रा.काँ.चे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील, रा.काँ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, प्रदेश युवक सरचिटणीस रणजीत लोमटे, विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड.गोविंद फड, पंचायत समितीचे सभापती सौ.उर्मिलाताई बबनभाऊ गित्ते, उपसभापती बालाजी (पिंटू) मुंडे, नगरसेवक चंदुलाल बियाणी, जिल्हा परिषद सदस्य मधुकर आघाव, उपनगराध्यक्ष शकिल कुरेशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली गडदे, माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, रा.काँ.चे उपाध्यक्ष सुरेश टाक, माजी सभापती सुर्यभान मुंडे, पं.स.सभापती अंबाजोगाई प्रा.प्रशांत जगताप, उपसभापती समिर पटेल, विलास मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, प्रभारी अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय डॉ. दिनेश कुरमे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. विनोद जगतकर, ज्येष्ठ नेते तुळशीराम पवार, नंदागौळचे सरपंच सुंदरभाऊ गित्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माणिकभाऊ फड, नगरसेवक शरद मुंडे, शहराध्यक्ष सय्यद सिराज, तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, गणेश देशमुख, अरविंद जगताप, शहरचिटणीस अनंत इंगळे, पांगरीचे उपसरपंच अँड. श्रीनिवास मुंडे, युवा नेते माधव मुंडे, युवा नेते अँड.प्रकाश मुंडे, वकील संघाचे अँड. मनजीत सुगरे, तालुकाध्यक्ष विद्यार्थी आघाडी जयदत्त नरवटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर होळंबे, पदमाकर शिंदे, दिनेश गजमल, बळीराम नागरगोजे, प्रा.अतुल फड, शितलदास आरसुळे , भरत शिंदे, मयुर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.  डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हाँस्पीटल, बस स्टँड- गार्डन रोड, परळी येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जिल्हा आरोग्य विभाग, बीड, नाथ प्रतिष्ठान, परळी वैजनाथ, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व स्टारकी फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून प्रत्येक व्यक्तीसाठी अंदाजे 25 हजार रूपये किंमतीच्या मोफत डिजिटल श्रवणयंत्र (कनाची मशीन) वाटपासाठी पुर्वितपासणी शिबीराचे आयोजन दि.06 व 07 मार्च रोजी होणाऱ्या पुर्वितपासणीची नाव नोंदणी 2 व 6 मार्च पर्यंत सकाळी 9 ते 2.वाजे पर्यंत करण्यात यावेत. या शिबिरात अमेरिकेतील तज्ञ डॉक्टर यांच्या हस्ते तपासणी होणार आहे.  या शिबीरात तपासणी झालेल्या व्यक्तींनाच मशीन मिळणार आहेत. या तपासणी झाल्यानंतर लवकरात लवकर ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहेत. तरी या शिबीरात सोबत येतांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र सोबत आणावे. तरी परळी तालुक्यातील व शहरातील कमी ऐकू येणाऱ्या / कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पूर्व तपासणी शिबिराचा मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे (9822280568) यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment