बीडः जिल्ह्यात जनता कर्प्युला कडकडीत प्रतिसाद असुन लोक घरामध्ये बसलेले आहेत. अशा परिस्थितीत जर एखाद्याला दवाखान्यात जाण्याची तातडीची गरज पडली आणि सार्वजनिक वाहन मिळत नसेल तर त्याला दवाखान्यात जाण्यासाठी पोलीस वाहन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी ही माहिती दिली आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाने पोलीस नियंत्रण कक्षाला ०२४४२२२२६६६ किंवा ०२४४२२२२३३३ या क्रमांकावर फोन करुन आपला पुर्ण पत्ता कळवावा, त्यांना नजिकचे पोलीस वाहन दवाखान्या पर्यंत पोहचवेल असे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्यर यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment