Monday, March 2, 2020

परळी तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.याञेकरूची ही निराशा .

*तात्काळ पंचनामे करण्याची नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांची मागणी.
परळी ( प्रतिनीधी ) अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे परळी शहरात महाशिवरात्री निमित्त भरलेल्या यात्रेवर विर्जन पडले तर शेतकऱ्यांचे हातात आलेले पीक आडवे पडल्यामुळे अतोनात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे शहरात आणि तालुक्यात आणि ठिकाणी झाडे आडवी पडली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याविषयीचे आदेश द्यावेत अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.काल दुपारी अचानक पाऊस आणि वादळी वार्याला सुरुवात झाली. महाशिवरात्रीनिमित्त प्रवेश शहरांमध्ये यात्रा भरते यात्रा सात दिवस चालते सदर पावसामुळे काही अंशी यात्रेवर परिणाम झाला रविवार असून देखील परळीकर नागरिकांना यात्रेचा म्हणावा तसा आनंद घेता आला नाही परिणामी काल यात्रेमध्ये शुकशुकाटच होता.
तसेच अवकाळी पावसामुळे परळी तालुक्यात अनेक भागात हरभरा, ज्वारी, आणि काडणीला आलेल्या गव्हाचे प्रचंड नुकसान झाले. पीके आडवी पडली. हरभरा काढणीस आला होता त्याच्या पसरी पडल्या होत्या. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक उद्ध्वस्त झाले आहे. हातात आलेले पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.तेव्हा अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी गंभीर दखल घेऊन महसूल विभागात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करण्याविषयी चे आदेश द्यावेत अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यां कडून होत आहे.

No comments:

Post a Comment