Sunday, March 22, 2020

शिवसंग्रामभवन कोरोनामुळे 31 मार्चपर्यंत बंद राहणार जनतेनी त्यांच्या अडचणी - तक्रारी व्हॉट्सअप, एसएमएस, ईमेलद्वारे पाठवाव्यात - आ विनायक मेटे

बीड(प्रतिनिधी) :- कोरोनाचा प्रसार जितका शक्य आहे तितका रोखणे हि सर्वांची जबाबदारी आहे. आगामी काळातील वाढता संसर्ग लक्षात घेत प्रशासनाने विविध उपाययोजना आदेशित केलेल्या असून शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे यांचे संपर्क कार्यालय शिवसंग्राम भवन ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. बीडसह जिल्हाभरातून या ठिकाणी शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला, कामगार, निराधार आपल्या समस्या घेऊन येत असतात. आ विनायक मेटे यांचा संपर्क संपूर्ण जिल्हाभरात असल्याने येथे आपल्या तक्रारी व समस्या घेऊन येणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यापूर्वी हे कार्यालय सर्वांसाठी खुले होते मात्र कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी प्रश्सानाने केलेल्या सूचनांचे पालन करत हे कार्यालय आता बंद करण्यात येणार आहे.
बीड जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सुचवलेल्या उपाय योजनांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आपले संपर्क कार्यालय व घर अभ्यंगतांसाठी बंद ठेवावे असे आदेश निर्गमित करत निर्देशित केले आहे. त्यानुसार आता नगर रोड येथील शिवसंग्रामभवन येत्या ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असून जनतेनी त्यांच्या अडचणी - तक्रारी व्हॉट्सअप, एसएमएस, ईमेलद्वारे खालील नंबर व इमेलवर पाठवाव्यात, त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू,  विनोद कवडे ( स्वीय सहायक ) ९०११३५६४६४, धनंजय गुंदेकर( स्वीय सहायक तथा जनसंपर्क अधिकारी)- ९६८९०४३९४९, ७०२०६१६३३९, कार्यालयीन प्रमुख शेषेराव तांबे ७५१७६०६१५८, राजू येडे ( स्वीय सहायक )९००४०४५१११, अर्जुन शिंदे ( स्वीय सहायक )९६२३३११०५५ इमेल :- shivsangrambhavanbeed@gmail.com यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आ मेटे यांच्याकडून करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment