परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तळेगाव व
परिसरात वादळी वार्यासह अवकाळी गारांच्या पावसाने गहू, ज्वारी, हरभरा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी उद्धवस्त झाला आहे. अवकाळी पावसाने शेतकर्याच्या घामाचे हिसकावून घेतल्याने प्रशासनाने तात्काळ सदरील पंचनामे करून सरकारने नुकसान झालेल्या शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तळेगाव येथील शेतकरी भागवत मुंडे यांनी केली आहे. कोरोना कहर असतांना
21 दिवसाच्या कडेकोट लॉकडाऊनसमोर वादळी पाऊस आणि गारपीटीने शेतकरी संकटात सापडला आहे.
परळी तालुक्यातील तळेगाव, टोकवाडी, लिंबोटा, पांगरी या गावासह अनेक गावात सोमवार दि.30 मार्च रोजी 6.44 वाजण्याच्या सुमारास वादळी वार्यासह अवकाळी गारांचा पाऊस झाला.या पावसाने गहू, ज्वारी, हरभरा, जवस, ऊस, पालेभाज्या व बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी निघालेल्या पिकांचे खळे चालू होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान मोठे असून यामुळे शेतकरी उद्धवस्त आणि हवालदिल झाला आहे.खरीपाने शेतकर्यांना साथ दिली नव्हती. परंतु,एका पावसाने रब्बीचे पिक जोमात आले होते.परंतु,अवकाळी पावसाने शेतकर्याच्या घामाचे हिसकावून घेतल्याने.शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तसेच अवकाळी पावसामुळे डाळीबाची फुलगळ, फळगळ झाली आहे. तर द्राक्षांची काढणी अंतिम टप्यात असून झालेल्या पावसामुळे मण्यांना तडे गेले. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पावसामुळे रब्बी पिके जमिनोदोस्त झाली आहेत. काढणीला आलेली पिके हातची गेल्याने शेतकर्यांमध्ये दुःखाचे सावट पसरले आहे. गतवर्षी रब्बीची पेरणी नव्हती यावर्षी आगात नाही.तरीही एका पावसाने कसे बसे आलेले रब्बीचे पिक निसर्गाच्या अवकृपेने अवकाळी पावसाने हिरावून नेले. गारांचे मोठे ढिगारे शेतात दिसून येत आहेत. हातातोंडाशी आलेली पीके पदरात पडतात की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. तसेच या जोरदार वादळात ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी घराचे पत्रे, शेतातील आखाड्यावरील पत्रे , बैलगाडीसह व साहित्य उडून गेले. काही शेतकरी जखमी झाल्या आहेत.ग्रामीण भागातील बऱ्याच गावांमध्ये घराचे पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणच्या वीजवाहक तारा तुटल्याने विजेचा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहेत. या जोडण्याचे काम परळी वीज महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर चालू आहे.
एकीकडे ‘कोरोना’चे सावट आणि दुसरीकडे अवकाळी- चे संकट. कोरोनाशी युद्धपातळीवर रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यात शेतकऱ्यांपुढे पण लहरी निसर्गाला रोखणार कसे हा प्रश्न आहेच. अवकाळीचे शुक्लकाष्ठ महाराष्ट्राच्या मागे काही वर्षांपासूनच लागले आहे. त्याचीच पुनरावृत्ती गारपिटीसह झाली. राज्यातील सत्ताधारी संवेदनशील आहेत. अस्मानी आणि सुलतानीच्या संकटातून शेतकऱयांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. अवकाळीच्या तडाख्याने रब्बीही हिरावून घेतलेल्या बळीराजाला उभे करावे लागेल. त्यामुळे शेतकरी संकटात असताना त्याला धीर देण्यासाठी सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून सरकारने नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी तळेगाव येथील शेतकरी भागवत मुंडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment