Monday, March 16, 2020

कोरोना व्हयरसच्या वाढत्या पार्श्वभूमीवर परळीच्या वैद्यनाथाचे दर्शन बंद.


परळी वैजनाथ ;- कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता राज्यभरात प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. आपल्या भाविकांना या रोगाचा संसर्ग होऊ नये यासाठी आता तर राज्यातील देवस्थान ट्रस्टही या कोरोना व्हायरसचा धसका घेतला आहे. प्रशासनाच्या सूचनेवरून 17 मार्च मंगळवार पासून पाचवे ज्योतिर्लिंग असलेलेल्या बीड जिल्ह्यातील परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने पुढील आदेश येईपर्यंत वैद्यनाथ मंदिर भाविकां साठी बंद ठेवणार असल्याचे सांगितले आहे.
देशात असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाचे दर्शन मंगळवार पासून बंद केले जाणार आहे. वैद्यनाथाच्या दर्शनासाठी विविध राज्याच्या काना कोपऱ्यातून हजारो भाविक येत असतात. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली आहे. प्रभू वैद्यनाथाच्या दैनंदीन षोडशोपचार पूजा नित्य पुजाऱ्यामार्फ़त केल्या जाणार आहेत, मात्र यावेळी कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.
भाविकांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून हा निर्णय प्रशासनाने घेतल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हूणून याआधीच देवस्थान ट्रस्टने दर दोन तासाला मंदिरात साफसफाई करण्यात सुरुवात केली आहे. या आधीच बीड जिल्हा धिकारी रेखावार यांनी कोरोना व्हायरसच्या जिवाणूंचा संसर्ग रोखण्या साठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून शाळा, महाविद्यालय यांना 31 मार्च पर्यंत सुट्टी देण्यात आली असून, अती महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment