Tuesday, March 3, 2020

बीडच्या रेल्वेला केंद्राने ४४९ कोटी दिले, आता राज्य सरकारनेही चालू अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी;- पंकजाताई मुंडे.

मुंबई दि.(प्रतिनीधी ) नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाकरिता केंद्र सरकारने ४४९.५ कोटी रूपयाची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे, आता राज्य सरकारनेही त्यांच्या चालू अर्थ संकल्पात भरीव तरतूद करावी अशी मागणी करत हा प्रकल्प ताकदीने आणि जलदग तीने पूर्ण करण्यासाठी राज्याने पाऊले उचलावीत असे पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.
राज्यातील नव्या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला गती आणण्यासाठी केंद्र सरकारने यंदाच्या (२०२० – २१) अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. बीड जिल्हयाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नगर-बीड-परळी हया रेल्वेमार्गा करिता खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यामुळे केंद्र सरकार ने यासाठी ४४९.५ कोटी रूपयाची तरतूद चालू अर्थसंकल्पात केली आहे. लोकनेते गोपीनाथ राव मुंडे साहेब यांच्यामुळे हया प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष दर्जा देऊन निधी मंजूर केला होता, या मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे, परंतु निधी अभावी काम रखडले जाऊ नये यासाठी केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारनेही आपला अर्धा वाटा उचलला पाहिजे. केंद्राने जशी तरतूद केली तशीच भरीव तरतूद राज्य सरकारने ही आपल्या चालू अर्थसंकल्पात करावी आणि हा रेल्वेमार्ग जलद गतीने व संपूर्ण ताकदीने पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी सरकारकडे केली आहे.

No comments:

Post a Comment