* नागरीकांना याचा नक्की उपयोग होईल ;-भोजराज पालीवाल.
परळी वैजनाथ;- (प्रतिनिधी ) देशात विशेषत: महाराष्ट्रात वाढत चाललेले कोरोनाचे संक्रमन लक्षात घेता घाबरण्यापेक्षा खबरदारीचे उपाय आणि काळजी घेतल्यास कोरोनाच्या संक्रमनाला आपण नागरिक रोखू शकतो असे मत शिवसेनेचे मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांनी व्यक्त केले. दरम्यान परळी शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक, मंदिर, स्टेट बॅंका, पोस्ट ऑफिस, सरकारी कार्यालये आदी गर्दीच्या ठिकाणी शिवसेने च्या वतिने माहिती पत्रकाचे वितरण करण्यात आले. यावेळी श्री.पालीवाल बोलत होते.
आज गुरूवार दि.19 मार्च रोजी शिवसेनेच्या वतिने कोरोनाचे संक्रमन लक्षात घेता सदर माहिती पत्रका द्वारे कोरोना संक्रमन कसे रोखावे ? काय काय काळजी घ्यावी ? आजाराची नेमकी लक्षणे काय आहेत ? आदीबाबतची माहिती या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. परळी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.रामेश्वर लटपटे यंाच्या हस्ते सदरच्या माहितीपत्रकाचे वितरण करण्यात आले. तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून सदरचे माहितीपत्रक तयार करण्यात आल्याने ते महत्वाचे ठरले आहे.यावेळी बोलतांना डॉ.लटपटे म्हणाले की, कोरोना या आजाराला नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. घरातून बाहेर गेलेले व्यक्ती घरात येईपर्यंत स्वत:चे हात चेहऱ्याला न लावता घरी गेल्यानंतर साबणाने स्वच्छ धुवावे स्वत:चे कपडे दररोज बदलावे, प्रवास टाळावा, बाहेर देशातून व बाहेर राज्यातून आलेल्या व्यक्तीची प्रशासनाला माहिती देवून कोरोनाचा प्रसार रोखावा असे सांगितले. यावेळी महेश केंद्रे, प्रकाश साळुंके, सचिन स्वामी, बाळासाहेब देशमुख, शिवाजी दराडे, हरीष पालीवाल, संजय गावंडे, विजय जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment