Friday, March 6, 2020

रोहन चंद्रशेखर फुटके यास १० वी बोर्ड परिक्षेत इतर मागास प्रवर्गातून देण्यात येणारा महाराष्ट्र शासनाचा स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार जाहीर.


*पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह, ५१ हजार रुपये रोख २४ मार्चला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह मुंबई येथे शासनाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार*

परळी वैजनाथ ता.०६( प्रतिनीधी ) महाराष्ट्र शासनाच्या वतीने शैक्षणिक वर्षे २०१६- २०१७ पासून राज्यातून व विभागीय परिक्षा मंडळातून १० वी १२ वीच्या परिक्षेत सर्वप्रथम आलेल्या इतर मागास प्रवर्गाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. २०१८- १९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता१० वी १२ वीच्या परिक्षेत राज्यातून व विभागीय परिक्षा मंडळातून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना गुणवंत विद्यार्थी पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून राज्याच्या सर्व विभागीय परिक्षा मंडळा तून ४१ गुणवंत विद्यार्थ्यांना स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबाद विभागातून १० वीसाठी शहरातील रोहन चंद्रशेखर फुटके याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 रोहन चंद्रशेखर फुटके यास महाराष्ट्र शासनाच्या वतीने इतर मागास प्रवर्गाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणारा स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आल्याचे महाराष्ट्र शासन इतर मागास वर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे आयुक्त यांनी परिपत्रकाद्वारे घोषित केले आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह, ५१ हजार रुपये रोख रक्कम असे असून २४ मार्चला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याचे समाजकल्याण अधिकारी बीड यांनी दुरध्वनी द्वारे कळवले आहे. रोहन फुटके हा येथील न्युहायस्कूल शाळेतील विद्यार्थी तो शाळेतही सर्व प्रथम आला होता. त्याचे वडील तालुक्यातील कासारवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहशिक्षक असून त्यांनाही बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आलेला आहे.तसेच आई स्काँलर केजी स्कूलच्या प्राचार्या आहेत. या पुरस्काराबद्दल रोहन चे फुटके परिवारा सह,सर्व नातेवाईक मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment