Saturday, March 14, 2020

कोरोनाच्या दहशतीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील ‘या’ महत्त्वाच्या यात्रा रद्द.

परळी वैजनाथ ;-(प्रतिनीधी ) चीनच्या वुहान प्रांतातून सार्‍या जगभरात पसरलेल्या करोनाने आता राज्यात देखील हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यात आतापर्यंत १७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या करोनाचा संसर्ग होऊ नये, यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या देवींच्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने आणि ग्रामपंचायतीने घेतला आहे. 
यामध्ये प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा पैठण ची नाथ षष्ठी यात्रा येरमाळा येथील येडेश्वरी याञा चंद्रपुर येथील यात्रा या सारख्या छोट्या मोठ्या यात्रा कोरोना च्या दहशती मुळे सुरक्षाच्या दृष्टीने   रद्द करण्याचा निर्णय प्रशासकीय समितीने घेतला आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीची सोमवती यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जेजुरी ग्रामस्थांनी जेजुरीची २३ मार्चला होणारी यात्रा देखील रद्द करण्याचा निर्णय जेजुरी ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यात्रेनिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment