परळी वैजनाथ ;- (प्रतिनीधी )
शासकिय आधारभूत किंमत योजनेतून नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी साठी नोंदणीला सुरूवात झाली असून नोंदणीची अंतिम तारीख 15 मार्च आहे. तथापि शेतकरी बांधवांनी तुर नोंदणीचा लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती सौ.उर्मिलाताई बबनभाऊ गित्ते यांनी केले आहे.
नाफेडच्या अंतर्गत शासकिय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हरभरा खरेदीसाठी तसेच तुर नोंदणीची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यां साठी ही एक चांगली संधी असून 15 मार्चपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. परळी शहरात तुर व हरभरा खरेदी नोंदणीची व्यवस्था जलालपुर रोड, तलाठी ऑफिससमोर, यशश्री दुकान तर संगम रोड ब्रह्मवाडी एरिया, टोकवाडी येथे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिक लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती सौ.उर्मिलाताई बबनभाऊ गित्ते यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment