Monday, March 2, 2020

अवकाळी पावसाने बळीराजा हवालदिल पिकांचे मोठे नुकसान.त्वरित पंचनामे करून हेक्‍टरी 30 हजार रुपये शेतकऱ्यांना द्या ;- प्रा. विजय मुंडे यांची मागणी.

परळी वैजनाथ;-  (प्रतिनिधी)..) दि .02
काल परळी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा हवालदिल झाला आहे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाली आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी 30 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी परळी मार्केट कमिटीचे उपसभापती  प्रा. विजय मुंडे यांनी केली आहे.
     परळी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेला गहू ,ज्वारी, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले असून आंब्याचा मोहर ही गळून पडलेला आहे. परळी परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला त्यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे अगोदरच संकटात सापडलेला बळीराजा पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे .खरीप हंगामामध्ये सुद्धा असेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हातचे पिके गमवावी लागली होती. शासनाने हेक्‍टरी 25 हजाराची तुटपुंजी मदत सुद्धा पूर्ण शेतकऱ्यांना मिळालेली नाही. निसर्गाने पुन्हा एकदा बळीराजावर घाला घालून शेतकरी आणखीन संकटात सापडला असून शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्याचे काम शासनाचे आहे म्हणून परळी परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई  द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
दिवस-रात्र काबाडकष्ट करून शेतकर्‍यांनी गहू ,हरभरा ,ज्वारी या पिकांना पाणी दिले सध्या ही सर्व पिके काढणीस आलेली आहेत आणि त्यातच निसर्गाने पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान केले आहे म्हणून बळी राजा टिकला तर देश टिकेल असे असताना शासनाने त्वरित पाहणी करून नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा असेही प्रा. विजय मुंडे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment