परळी वैजनाथ ( प्रतिनिधी) कै. डॉ. मंचकराव नरहरराव देशमुख यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त परळी वैजनाथ येथे दि. ८ व ९ फेब्रुवारी २०२६ (रविवार व सोमवार) रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर देशमुख अक्युपंचर सेंटर, देशमुख कॉम्प्लेक्स, गणेश पार, परळी वैजनाथ येथे होणार आहे.
या शिबिरात नागरिकांसाठी विविध आजारांवर मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार असून, विशेषतः अर्धांगवायू, पायांची नस दाबली जाणे, सांधेदुखी, मणक्याचे आजार, टाच दुखी, फ्रोजन शोल्डर, स्पॉन्डिलायटिस, सायटिका, कंबर व मानदुखी, डोकेदुखी, चक्कर येणे, स्नायू आखडणे, स्पोर्ट्स व लिगामेंट इजा, वजन कमी करणे, तसेच लहान मुलांचे टांग न धरणे व मतिमंद मुलांवरील उपचार करण्यात येणार आहेत.
शिबिरात अक्युपंचर थेरपी, सुजोक थेरपी, कपिंग थेरपी (बोन सेटिंग), कायरोप्रॅक्टिक, अक्युप्रेशर व फिजिओ थेरपी अशा आधुनिक व प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध असणार आहेत.
या उपक्रमात डॉ. राहुल देशमुख (अक्युपंचर व कायरोप्रॅक्टिक तज्ञ) आणि सौ. साधना देशमुख (अक्युपंचर थेरपिस्ट) हे रुग्णसेवा देणार आहेत.
कै. डॉ. मंचकराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजोपयोगी उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ९८६०४९१००२, ७०२०४९०९२९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment