मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण गुरवारी पहाटे 2 वाजता शेतातील कामासाठी ट्रॅक्टर चालवत जात होता. यावेळी शेत वळण रस्त्यावर ट्रॅक्टरला टर्न मारत असताना ट्रॅक्टर पलटी झाला. या झालेल्या अपघातात ट्रॅक्टर अंगावर पडल्याने गणेश गाडे यात गंभीर जखमी झाला. दरम्यान स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुण शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे तरुणाच्या गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Thursday, February 12, 2026
माजलगावमध्ये धक्कादायक घटना.हिवरा बुद्रुक गावात ट्रॅक्टर पलटी होऊन. शेतमजुराचा जागीच मृत्यू.
माजलगाव (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. माजलगाव येथील हिवरा बुद्रुक गावात ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघात शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. शेतीच्या वळण रस्त्यावर वळवताना चालक असणाऱ्या शेतमजुराच्या अंगावर ट्रॅक्टर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृ तरुण हा हिवरा बुद्रुक येथील शेतमजूर असून, गणेश भारत गाडे वय 28 असे मृत तरुणाचे नाव आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment