Friday, February 20, 2026

लाचेची मागणी झाली असल्याचा पुरावा मिळाल्यानंतर, एसीबी पथकाची सापळा रचून कारवाई.परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे ताब्यात!


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी जिल्ह्यात मोठी कारवाई करत परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराकडे 'ऐपतीचे प्रमाणपत्र' देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, महसूल विभागात या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

एका तक्रारदाराला आपल्या कामासाठी ऐपतीचे प्रमाणपत्र हवे होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम २० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. मात्र, व्यवहार ठरल्यानंतर तहसीलदार मुंडे यांना तक्रारदाराच्या हालचाली आणि वर्तनावर संशय आला. संशयामुळे त्यांनी प्रत्यक्ष पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली. 

लाचेची मागणी झाली असल्याचा पुरावा मिळाल्यानंतर, एसीबीच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. लाचेची मागणी करणे हा देखील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा असल्याने, शुक्रवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. चालू वर्षातील ही जिल्हयातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. ही धडक कारवाई एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तहसील कार्यालयातील इतर आर्थिक व्यवहारांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment