परळी वैजनाथ (प्रतिनिधी) प्रभाग क्रमांक १५ अ आज अक्षरशः “शिट्टीच्या गजराने” दुमदुमला होता. मागास प्रवर्गातील अपक्ष उमेदवार अजयभैय्या चौधरी यांच्या भव्य प्रचार फेरीने संपूर्ण प्रभागात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण केले. गोरगरीबांच्या मदतीला नेहमी धावून जाणारा, प्रामाणिक आणि लोकसंग्रही कार्यकर्ता म्हणून अजयभैय्या चौधरी यांची प्रतिमा मतदारांच्या मनात खोलवर रुजली असल्याचे चित्र या फेरीत प्रकर्षाने दिसले. “हा माणूस आमचा आहे आणि त्यालाच आम्ही जिंकवणार!” — असा एकमुखी निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.
अपक्ष उमेदवार अजय चौधरी यांनी प्रभागातील प्रत्येक घरपोच जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. हजारोंच्या संख्येने निघालेल्या रॅलीत नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा आणि विकासाच्या गरजांवर सविस्तर चर्चा करत चौधरी यांनी मतदानरूपी आशीर्वादाची विनंती केली.
प्रभागातील माता-भगिनींनी पारंपरिक औक्षण करून अजयभैय्या चौधरी यांचे मंगल स्वागत केले, तर युवकांनी शिट्ट्या, घोषणाबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण वातावरणात उत्साहाची उधळण केली. “पंधरा अ मध्ये अजयभैय्या चौधरी” हे घोषवाक्य रस्तोरस्त्यावर गुंजत होते.
अनेक मतदारांनी अजय चौधरी यांच्या स्वच्छ प्रतिमा, मेहनती स्वभाव, सर्वसामान्यांची कळकळ आणि विकासाभिमुख दृष्टीकोनावर भर देत, “प्रभागाचे खरे नेतृत्व अजयभैय्याच!” असा ठाम विश्वास व्यक्त केला. “त्यांना प्रचंड मतांनी विजयी करू” असा जनतेचा निर्धार आज स्पष्टपणे उमटला.
फेरीत प्रचारप्रमुख पापसिंह ठाकूर, संभाजी देशमुख, मुन्ना भैय्या सावजी, शुभम परदेशी, महिपाल ठाकूर, भगतसिंह ठाकूर, अविनाश शुक्ला यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले. आजच्या भव्य प्रतिसादामुळे “शिट्टीचा गजर” हा प्रभाग १५ अ मधील बदलाचा संदेश ठरला असून, अजयभैय्या चौधरी यांची उमेदवारी अभूतपूर्व पद्धतीने बळकट झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
No comments:
Post a Comment