Thursday, November 20, 2025

परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीतून नगराध्यक्षपदाचा 1 तर नगरसेवकपदाचे 16 उमेदवारी अर्ज मागे.

 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी वैजनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मधून आज दि.१९ व २० नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसात नगराध्यक्षपदा साठी १ तर नगरसेवकपदासाठी एकूण १६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे. खालील दिलेल्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज मागे घेतले आहेत. यात नगराध्यपदासाठी  पठाण खैसर राजाखान तर नगरसेवकपदासाठी प्रभाग 1 ब वाकडे शिवशंकर प्रभाकर, अपक्ष,प्रभाग 4 अ मस्के रमेश किशनराव, अपक्ष, प्रभाग  6 ब सचिन प्रकाशराव आरसुडे, अपक्ष प्रभाग 8 अ कांबळे नंदिनी विश्वजीत, अपक्ष,प्रभाग 9 ब शेख खतीजाबी मुसा, अपक्ष, प्रभाग 8 अ दहिवडे सुरेखा अशोक, अपक्ष,  प्रभाग 8 ब शेख अजीज इस्माईल अपक्ष, प्रभाग 9 अ, कुरेशी तोफीक शकील, अपक्ष,प्रभाग 9 ब सय्यद असीयाबेगम युनुस, अपक्ष,प्रभाग 11 अ, उपाडे कडीराम धोंडीबा, अपक्ष, प्रभाग 12 ब संजय रखमाजी फड, अपक्ष प्रभाग 12 ब कराड विशाल ज्ञानोबा अपक्ष प्रभाग 13 ब सौंदळे शकुंतला अरविंद अपक्ष प्रभाग 13 ब लड्डा सारिका जयप्रकाश, अपक्ष, प्रभाग 14 ब लड्डा सारिका जयप्रकाश, अपक्ष, प्रभाग 14 अ मनजीत रामलिंगअप्पा सुगरे, अपक्ष यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment