परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहरातील घरणीकर रोड येथील ज्येष्ठ नागरिक, सुस्वभावी व मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या श्रीमती सरूबाई गोविंदअप्पा कोल्हे यांचे रविवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनावेळी त्यांचे वय १०० वर्षे होते.
श्रीमती सरूबाई कोल्हे या परळी शहरात सर्वपरिचित होत्या. तेली समाजातील धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमांत त्या नेहमी पुढाकार घेत असत. अत्यंत शांत, संयमी व लोकाभिमुख स्वभावामुळे त्यांच्यावर सर्वांचा मोठा स्नेह होता.
त्यांच्या निधनाने कोल्हे कुटुंबासह परळी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पांडुरंगअप्पा, नरहरीअप्पा व प्रल्हादअप्पा ही तीन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर वीरशैव लिंगायत स्मशानभूमी येथे अंत्यविधी पार पाडण्यात आले. कांतीकारी साथी भावपूर्ण श्रध्दांजली.
No comments:
Post a Comment