परळी वैजनाथ ( प्रतिनिधी)-परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ राज्याच्या प्रमुख नेत्यांच्या हस्ते होणार आहे. दि. २३ नोव्हेंबर रविवारी रोजी दुपारी ठीक एक वाजता होणार असून राज्याचे प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड, ज्येष्ठ नेते फुलचंद कराड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते दीपक रंगनाथ देशमुख, पक्षाचे प्रभारी डॉ. नरेंद्र काळे, ज्येष्ठ नेते प्रभाकर वाघमोडे आणि बाळासाहेब देशमुख, यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे.
सर्वप्रथम हनुमान मंदिर मोंढा येथे परळी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विकसित परळीचे संकल्प पत्र आणि श्रीफळ फोडून व त्यानंतर आझाद नगर येथील दर्ग्यास चादर अर्पण करून प्रचाराची सुरुवात होणार आहे.
या संकल्प पत्रात प्रमुख्याने सुंदर परळी स्वच्छ परळी तसेच दहशतमुक्त आणि महिला सुरक्षा यावर भर देण्यात आला असून, त्या अनुषंगाने प्रचाराच्या शुभारंभ वेळी जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते दीपक रंगनाथ देशमुख व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ संध्या दीपक देशमुख यांच्या निवासस्थानापासून, गणेश पार येथून या प्रचार रॅली सुरुवात होणार आहे, पुढे ही रॅली राणी लक्ष्मीबाई टाँवर, मोंढा मार्केट, एक मिनार चौका मार्गे, स्टेशन रोड भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन, तसेच, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील मुख्य कार्यालय येथे समारोप होणार आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व नेते कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बाबा शिंदे, जेष्ठ नेते उत्तम माने, अड. जिवनराव देशमुख ,शंकर शेजुळ, मुन्ना काळे, सय्यद फिरोज ,वर्षा रायभोळे कल्पना देशमुख, अक्षय सोनवणे, प्रकाश देशमुख आदी शहर व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून कडुन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment