परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ येथे आज दिनांक 21जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
21जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन संपुर्ण जगात साजरा करण्यात येतो. या दिवसाची संकल्पना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजी नी मांडली आणी ती प्रत्यक्षात उतरवली.त्याच निमित्ताने हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता ना.
परळी येथील जिजामाता उद्यान येथे पंतजली योग समिती जिजामाता गार्डन क्लब तसेच वैद्यनाथ बँक व इनर व्हिल क्लब यांच्या सर्वच्या सहकार्य व संयुक्त विद्यमाने अंतर राष्ट्रीय योग्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी योगासने चे प्रात्यक्षिक सौ सरला भाभी उपाध्याय यांनी करून दाखवत उपस्थितांना योगाचे व विविध योग आसनांचे धडे दिले.
यावेळी झालेल्या या कार्यक्रमात पतंजली योग समिती व जिजामाता गार्डन क्लब व वंदना प्रतिष्ठान यांच्या वतीने सोमेद्र शास्री भाजप शहर अध्यक्ष सौ उमा समशेट्टी यांच्या सह मान्यवरचा सत्कार करण्यात आला. तर ना. पंकजाताई मुंडे यांच्या वतीने. योग शिक्षिका सरला उपाध्याय. छाया बुरांडे. शालिनी बोधे यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच राजु पारसेवार काकांनी सर यांचाही सन्मान करण्यात आला.
वेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री त्रिंबक कांबळे साहेब तसेच उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे सर यांच्या विशेष उपस्थिती तसेच सर्व संस्थेचे पदधिकारी. नागरीक योगा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment