Monday, June 16, 2025

जि.प.ची काजीपार येथील नूतन प्राथमिक शाळा मोडकळीस.पावसाळ्यात कुठल्याही क्षणी शाळा कोसळू शकते विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका....

 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जिल्हा परिषद अंतर्गत काझीपार नूतन प्राथमिक शाळा परळी येथे ज़िपची शाळा अनेक वर्षापासून सुरू आहे.शाळेची स्थापना 1953 झाली असून. ही शाळा खाजगी मालकीच्या    मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग भारतात. इमारतीचा मालक भाड्यापोटी वर्षाला लाखो रुपये घेत आहे. रख रखा डागडुजी थातूरमातूर पद्धतीने करतो. ही शाळेची इमारत मोडकळीस आली असून शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तात्काळ मोडकळीस आलेल्या इमारती मधून  शाळा इतरत्र हलवा,किंवा  स्थलांतरित करा. अशी मागणी या भागातील पालकांकडून केली जात आहे. दिनांक 16 जुन 2025 पासून शाळा सुरू झाले आहेत. काजीपार शाळेची सध्या दयनीय अवस्था असून शाळा ही मोडकळी झाली आहे. ही शाळा कधीही पावसात पडू शकते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
 गटशिक्षणाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शाळेच्या इमारतीचा मालक या शाळेत काही दुर्घटना घडली तर जबाबदार असतील. लवकरात लवकर ही शाळा स्थलांतरित करावी  किंवा इतरत्र हलवावी. अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो. याला जिल्हा परिषद शिक्षण विभाग कारली होत असेल.तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी या भागातील शाळा शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment