नागपूर (प्रतिनिधी) नागपूर संत कबीर जयंती निमीत्ताने श्रीगुरुदेव सेवामंडळ, नागपूर च्या वतिने दि.12 जून 25 रोजी रात्री 8 वाजता राष्ट्र संत तुकडोजी महाराज सभागृहात महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या पुणे येथील सत्यशोधक रघुनाथ दादा ढोक यांचा सन्मानचिन्ह ,राष्ट्र. संत तुकडोजी महाराज ग्रंथ व पुष्पगुच्छ आचार्य हरीभाऊ वेरुळकर यांचे शुभहस्ते देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. महात्मा फुलेंच्या वेषात रघुनाथ ढोक सत्यशोधक पद्धतीने लग्न व वास्तुसोहळे पार पाडीत इतर ही सामाजिक क्षेत्रात गेली 34 वर्ष काम करीत आहेत.त्यांनी गेल्या 5 वर्षात महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीने महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात एकूण 53 जातीय, आंतरजातीय , विधवा, विधुर, घटस्पोटीत, विकलांग विना मोबदला विवाह लावले आहेत. त्यातील 7 विवाह स्वतःचे घरात लावले आहेत.तसेच मोफत 14 वास्तू सोहळे देखील पार पाडले आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आचार्य हरिभाऊ वेरुळकर, होते. ते म्हणाले की रघुनाथ ढोक यांचा सत्कार म्हणजे मानवतावादी विचारांचा सत्कार असे मत मांडले. सत्कारमुर्ती रघुनाथ ढोक यांनी माझा सत्कार नसुन फुलेंच्या विचारांचा गौरव आहे. सत्कारामुळे फुलेंच्या विचाराप्रती माझी जबाबदारी वाढली असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक यावले यांनी संत कबीरांचा फुंलेच्या विचारांमुळे सामाजिक बंध आणखी घट्ट होतात असा विचार दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुरेंद्र बुराडे यांनी तर सूत्रसंचालन राजेश कुंभलकर यांनी केले. कार्यक्रमाला ज्ञानेश्वर रक्षक , सावित्रीबाई फुलेंचे वारस डाँ.दिलीप नेवासे,सातारा, माजी न्यायाधीश शिवदास महाजन, पुणे,जेष्ठ साहित्यिक कवी मधू बावलकर,तेलंगणाचे ,माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे , उपस्थित होत्या. दिलीप सुरमाजीकार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव विठ्ठलराव पुनसे,संगीता जावळे, प्रभा ठवकर प्रा.रामदास टेकाडे,रुपराव वाघ, मुरलीधर नरड,सियाराम चावके,आंनद माथने बहुसंख्य पुरोगामी विचारवंत उपस्थित होते.
No comments:
Post a Comment