Wednesday, June 11, 2025

जळालेल्या बसमुळे दुचाकी घसरली समोरील ट्रकने १५० फूट फरफटत नेले, एकाचा मृत्यू.


केज (प्रतिनिधी) सोमवारी पेट घेतलेल्या बसचा सांगाडा रस्त्याच्या कडेला तसाच आहे. याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरील दोघे रस्त्यावर पडले. याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीसह दोघांना जवळपास १५० फूट फरफटत नेले. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. हा अपघात सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास केज ते कळंब महामार्गांवर बोबडेवाडी शिवारात घडला.

केजहून कळंबकडे 22 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान  बोबडेवाडी शिवारात अचानक आग लागली. आग विझल्यानंतर बस (एम. एच. 11 बीएल 9374) बोबडेवाडी शिवारातील फरीदबाबा दर्गा परिसरात रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. दरम्यान, रात्री आठ वाजेच्या दरम्यान गणेश कल्याण हाके आणि अशोक बबन हाके ( दोघेही रा. माळेवाडी) हे दोघे केजकडून साळेगावकडे दुचाकीवरून (एम. एच. 44 एबी 6234 ) जात होते. रस्त्याच्या कडेला उभ्या बसचा अंदाज न् आल्याने आणि समोरील वाहनाच्या प्रकाश झोतामुळे चालकाचा ताबा सुटून दुचाकी रस्त्यावर पडली.याच वेळी कळंबकडून केजकडे भरधावं वेगात जात असलेल्या ट्रकने ( क्रमांक एम. एच. 10 एस. 7916)  दुचाकीसह दोघांना 150 फूट फरफट नेले.

या अपघातात अशोक बबन हाके ( 35 ) आणि गणेश हाके ( 32 ) हे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही रुग्णवाहिकेतून उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज हजारे यांनी तपासणी करुन अशोक बबन हाके यास मृत घोषित केले. तर गणेश कल्याण हाके यास पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात रवाना केले.

No comments:

Post a Comment