Sunday, June 1, 2025

लोकांनीच अडवला रस्ता मग कशी जाणार रुग्णवाहिका? तहसिलदारांनी उपस्थित केला प्रश्न.


आष्टी (प्रतिनिधी): रस्ता नसल्याने प्रसूती झालेल्या बाळंतिणीला उपचारासाठी बाजेवरून एक किलोमीटर अंतरावर नेल्याची घटना आष्टी तालुक्यात घडली होती. यानंतर तहसीलदार वैशाली पाटील यांनी शनिवारी गावात जाऊन चिखलातून वाट काढत लोकांशी संवाद साधला. वस्तीवर जाण्यासाठीचा रस्ता लोकांनी अडवला. मग अशावेळी रुग्णवाहिका कशी जाणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला प्रशासनाने याची पाहणी केली.

रस्ता आहे हो, पण...

प्रसूती झाल्यानंतर बाळंतिणीला उपचारासाठी बाजेवरून रुग्णालयात नेल्याचा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाला होता. पण, प्रकरण घडले आहे किंवा कसे? याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांनी खात्री केली.

त्यांनी सांगितले की, ही गरोदर महिला ससाणे वस्तीवरील असून, तेथे जाण्याकरिता रस्ता उपलब्ध आहे; परंतु साधारणत: ५०० ते ६०० फूट रस्ता त्यांच्यातीलच लोकांनी अडवलेला असल्यामुळे त्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आलेले नाही. तिथे मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे. त्या ठिकाणी रुग्णवाहिका जाणे शक्य नव्हते. रस्त्याची मोजणी करून रस्ता करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

मला विनम्रपणे सांगायचे आहे की, या व्हिडिओमध्ये परिस्थिती व रस्त्याची परिस्थिती यामध्ये तफावत आहे व गावकऱ्यांनी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात गाजावाजा केलेला आहे. तसेच आजअखेर या कार्यालयाकडे कोणीही रस्त्याची मागणी केलेली नाही.-वैशाली पाटील, तहसीलदार आष्टी

No comments:

Post a Comment