परळी वैजनाथ (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत बीड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व चंपावती क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच बीड जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा दिनांक १० व ११ जून २०२५ रोजी बीड येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत परळी येथील उर्जित मधुकरअप्पा गिरवलकर याने ११ वर्षाखालील वयोगटात एकेरी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत घवघवीत संपादन केले आहे.
उर्जित हा परळी येथील श्री वीरभद्रेश्वर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मधुकरअप्पा गिरवलकर यांचा मुलगा आहे
लहानपणापासूनच एक वेगळे क्षेत्र निवडत तो प्रशिक्षक चेतन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटनचे धडे गिरवत आहे.त्याच्या या यशाबद्दल बीड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अमरसिंह पंडित, आमदार विजयराजे पंडित,बीड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव डॉ.बळीराम गवते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment