केज (प्रतिनिधी) सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटस शेअर केल्याच्या रागातून दोघांनी एका तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना लहूरी येथे गुरुवारी संध्याकाळी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास लव्हुरी येथील एका हॉटेल समोर बसलेल्या गणेश नागनाथ चाळक यास गावातीलच राहुल सर्जेराव चाळक आणि कैलास सुरेश चाळक या दोघांनी, तु तुझ्या सोशल मीडीयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे स्टेटस का ठेवलेस? असा जाब विचारला. यारून त्यांच्यात वाद झाला. यातूनच कैलासने लोखंडी रॉडने गणेशच्या हातापायावर मारहाण केली.तर राहुलने गणेशला जिवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्याने मारहाण केली. यावेळी अमोल इंदरराव चाळक, नागनाथ हरिभाऊ चाळक यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
याप्रकरणी गुरुवार दि. 7 मार्च ला मध्यरात्री पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व त्यांच्या सहका-यांनी गणेश चाळक याचा स्वाराति रुग्णालयात जवाब घेतला. शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान राहुल सर्जेराव चाळक व कैलास सुरेश चाळक दोघेही रा लव्हुरी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे
No comments:
Post a Comment