छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तिचे अश्लील व्हिडिओ व फोटो मोबाईल मध्ये काढून ते तरुणीच्या आईला व्हाट्सअप द्वारे पाठवल्याची खळबळ जनक घटना सिल्लोड तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय शेजुळ असं आरोपीचं नाव आहे. याबाबत सिल्लोड पोलिसांमध्ये पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी दत्तात्रय शेजुळ याच्यासोबत पीडित मुलीची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. दत्तात्रय याने या पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिचे फोटो आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये काढले. यानंतर त्याने हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर वारंवार अत्याचार केला. मात्र पीडितेनं विरोध केल्यानंतर त्याने आपल्या जवळचे फोटो आणि व्हिडीओ पीडित तरुणीच्या आईला व्हाट्सअॅपवर पाठवले. तसेच ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित युवतीने सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपीविरोधात बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment