आष्टी (प्रतिनिधी) अंघोळ करून बाहेर येताना बाथरूमजवळ असलेल्या विद्युत वायरला हात लागून विजेचा धक्का बसून तरुण ठार झाला. ही घटना सोमवार दि.२५ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास सुलेमान देवळा येथे घडली.
महेश दादासाहेब तोरडमल वय 26 वर्षे असे मृत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी मोहिनी, मुलगी, वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे सुलेमान देवळा व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment