सुनील लांडगे असे आरोपी पतीचे नाव असून त्याने आपली पत्नी लीला आणि दोन मुलींना घरात कोंडले. त्यानंतर बाहेरून कुलूप लावून घरामध्ये पेट्रोल टाकत आग लावून पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारले आहे. हा सर्व प्रकार सुनील याने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून केल्याची माहिती समोर आली आहे.आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी सुनील याच्या घराकडे धाव घेतली. मात्र घराला कुलूप लावलेले असल्यामुळे त्यांना काही मदत करता आली नाही आणि घरामध्ये कोंडून टाकलेल्या पत्नी आणि मुलींचा जागीच होरपळून मृत्यू झाला.दरम्यान, नगर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेतलं आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सुनील याने केलेल्या कृत्याची लगेचच पोलिसांना कबुली दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
No comments:
Post a Comment