Saturday, March 2, 2024

जिजामाता उद्यान मधील मुर्तींना महाशिव रात्री निमित्त रंगरंगोटी करावी.जिजामाता गार्डन हेल्थ क्लब व शिव भक्तांची न.प.परळी कडे निवेदनाद्वारे मागणी.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाशिवरात्री उत्सवनिमित्त जिजामाता गार्डनमधील प्रभू श्री महादेव व माँसाहेब जिजाऊ यांच्या मुर्तींना रंगरंगोटी करून परिसर सुशोभित करावा अशी मागणी जिजामाता गार्डन हेल्थ क्लब व शिवभक्तांनी परळी नगर परिषदेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत नगर परिषदेस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाशिवरात्री उत्सव अवघ्या आठ दिवसांवर येवून ठेपला असून परळी शहरातील एकमेव जिजामाता गार्डन असून येथे प्रभू श्री महादेव व माँसाहेब जिजाऊ यांचा पुर्णाकृती मुर्ती आहे. या दोन्ही मुर्तींचा रंग गेल्या दोन वर्षापासून मुर्तींना रंग न दिल्याने  पूसट झाला आहे. महाशिवरात्री असल्याने बाहेरगावाहून येणारे लाखो भाविक गार्डनला भेट देत असतात. त्यामुळे परळी नगर परिषदेने लवकरात लवकर दोन्ही मुर्तींना रंगोरंगोटी करून परिसर स्वच्छ व सुशोभित करावा अशीही मागणी या निवेदनाद्वारे जिजामाता गार्डन हेल्थ क्लबचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य तसेच तमाम शिवभक्तांनी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment