अंबाजोगाई (प्रतिनिधी) : दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अर्थात या दुष्काळात अंबाजोगाईकरांवर दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे. कारण अंबाजोगाई नगरपालिकेने पाणीपट्टी बिल न भरल्याने बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या धनेगाव येथील मांजरा धरणातू न अंबाजोगाईचा बिगर सिंचन योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे नागरिकांना पाण्याची नाहक समस्या जाणवत आहे.
अंबाजोगाई बिगर सिंचन योजनेच्या पाणीपुरवठ्याचे ५ कोटी १४ लाख थकीत आहेत. यामुळे पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. नगरपालिकेकडे मागील काही वर्षांपासून पाणी पट्टीची रक्कम थकीत ठेवली आहे. विशेष म्हणजे अंबाजोगाई नगरपालिकेने या वर्षात अवघे ५ लाख ७० हजार ४५६ रुपये बील भरले आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांनी अंबाजोगाई नगरपालिकेला ७ मार्च २०२४ ला नोटीस जारी करून १५ मार्चपर्यंत थकीत ५ कोटी १४ लाख रुपये पाणीपट्टी भरण्याचे सांगितले होते.
नोटीसकडे केले दुर्लक्ष
मात्र सदरच्या नोटीसला अंबाजोगाई नगरपालिकेने गांभीर्याने घेतले नाही. आणि नोटिशीनुसार सदरची थकीत पाणीपट्टीची रक्कम भरण्यास दुर्लक्ष केले. यामुळे बिगर सिंचन योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. दरम्यान या नगरपालिकेच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना मात्र आता पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
No comments:
Post a Comment