Thursday, March 7, 2024

संपत्तीच्या वादातून पतीची हत्या आत्म हत्या केल्याचा पत्नीचा बनाव.


गेवराई (प्रतिनिधी) प्रॉपर्टीच्या वादातून पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव केलेल्या महिलेस पोलिसांनी बेड्या या ठोकल्याची घटना तालुक्यातील धोंडराई येथे घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुनिल निवृत्ती चातूर वय 43 वर्ष राहणार धोंडराई ता.गेवराई हा ईसम मयत झाला असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली त्यावरून घटनास्थळी पोलिस दाखल झाले. यावेळी आपल्या नवऱ्याने रात्री दोनच्या सुमारास गळफास घेतला असल्याची माहिती पत्नीने पोलिसांना दिली.पोलिसांना आलेल्या संशयावरून मयताच्या पत्नीची एक तास चौकशी केली. यावेळी तीने आपले पतीसोबत पटत नाही तसेच प्रॉपर्टी च्या वादातून गळा दाबून जिवे मारले असल्याची कबूली गेवराई पोलिसांना दिली तसेच आरोपी महीला शारदा सुनिल चातूर वय 35 वर्ष हिला ताब्यात घेतले असून तिच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया उशिरापर्यंत सुरू होती.

No comments:

Post a Comment