Saturday, March 9, 2024

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक भाजप नेते मा.आ धोंडे यांचा कार्यक्रम बंद पडला.


बीड (प्रतिनिधी)  निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आष्टी पाटोदा मतदार संघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा चोभा निमगाव या ठिकाणी “गाव चलो अभियान “कार्यक्रम सुरू असताना मराठा आंदोलकांनी तो बंद पाडला.यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, अशा घोषणा देत मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत गावात कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम होऊ देणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा सकल मराठा समाजाने घेतला आहे. चोभा नीमगाव येथे माजी आमदार भिमराव धोंडे यांनी कानिफनाथ विद्यालयामध्ये ‘गाव चलो अभियान’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रम सुरू होताच पन्नास ते साठ मराठा कार्यकर्ते घोषणाबाजी करीत आले व शाळेतील कार्यक्रमात पक्षाचे बॅनर का? असा प्रश्न उपस्थित करत कार्यक्रमस्थळी मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. मराठा आंदोलकांनी हा कार्यक्रम बंद पाडला. यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं..! अशा घोषणा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment