पाटोदा (प्रतिनिधी) : कामानिमित्ताने व्यापारी पाटोदा शहरात आले असता त्यांनी आपली कार मार्केटच्या पार्किंगमध्ये पार्क केली. त्यांनी कारमध्ये रोकड ठेवली होती. परंतु त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या अज्ञात व्यक्तींनी कारची काच फोडून पावणेदोन लाख रुपयांची बॅग घेऊन पसार झाले.
कारची काच फोडून व्यापाऱ्याची १ लाख ८० हजार रुपयांची रोकड ठेवलेली बॅग चोरट्यांनी पळविल्याची घटना बीडच्या पाटोदा शहरात रात्रीच्या दरम्यान घडलीय. महादेव रोहिदास येवले (रा. बामदाळ वस्ती पाटोदा) असं व्यापाऱ्याचे नाव आहे. व्यापारी महादेव येवले यांचे पाटोदा येथे अडत व्यवसाय आहे. ते काही कामानिमित्त पाटोदा शहरातील कांकरिया यांच्या कृषी दुकानासमोर कारने आले होते.
कार पार्क करताच साधली संधी
कार पार्क करून महादेव येवले हे दुकानात गेले. ही संधी साधून चोरट्यांनी आडोसा व अंधाराचा फायदा घेत कारची काच फोडून १ लाख ८० हजार रुपयांची बॅग चोरुन नेली. याप्रकरणी महादेव येवले यांच्या फिर्यादीवरुन पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
No comments:
Post a Comment