Friday, September 1, 2023

भारतीय नाविकांचे यूवा नेतृत्व अभिजीत सांगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझे जीवन समूद्री खलाशांसाठी आहे असे म्हणारे ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियन चे कार्याध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. 
अभिजीत सांगळे मागील 1८ वर्षांपासून व्यवसायाने मरीन इंजिनियर आहे आणि मर्चंट नेव्ही च्या कार्गो शिप्सवर ते कार्यरत होते. २०१९ मध्ये संजय वा. पवार व अभिजीत दि. सांगळे यांनी ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियन ची स्थापना केली व आजवर च्या शिपींग क्षेत्रात नावाजलेल्या ठराविक यूनियन मधून गेल्या ४ वर्षात सिफेरर्स ची सर्वात जास्त पसंती असलेली संध्याची एकमेव यूनियन म्हणून ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियन चे नाव सोशल मेडिया च्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. सिफेरर्स साठी ग्राउंड लेवल वर काम करणारी ही यूनियन आहे ज्यांनी कमी वेळात भारतीय सिफेरर्स चे मन जिंकले आहे आणि केंद्रिय मंत्रालयात आपला वेगळाच वलय निर्माण केला आहे. या सर्व यूनियन च्या कार्यात अभिजीत सांगळे यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांना विश्वास आहे की, भविष्यात लवकरच एक वेगळे परिवर्तन आपण शिपींग क्षेत्रात आणू आणि त्यासाठीचे त्यांचे प्रयत्न चालू आहे.
भारतीय सिफेरर्स चे यूवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आज पाहीले जाते आणि भारतीय राजकारणावर त्यांचे विचार त्यांनी पूढे मांडले आहेत की, राजकारण फक्त निवडणुकीपुरतं किंवा लढायांपुरतं मर्यादित नसाव. राजकारणाला विचार असणं व त्या विचारांना मूल्यांचा आधार असणं व हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा व हेतू असणं आवश्यक आहे. असा विचार प्रत्येक नागरिकाने व राजकारण्यांनी ठेवणं गरजेचं आहे.
आपल्याला काय करायचंय हे आधी निश्चित करायला हवं,आपली दिशा पक्की असायला हवी.आपण सर्व नागरिकांनी सर्वांनी मिळून एक मोठ्या माणुसकीचं व जगात शांतता नांदेल,प्रत्येक हाताला काम मिळेल,शेतकरी सधन होईल असं काम करणं व ती व्यवस्था निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच अखंड राष्ट्र सुखी झाले असे म्हणता येईल.
राजकारण हे केवळ निवडणुकी पुरता मर्यादित नसावं असे स्पष्ट वक्तव्य चौफेर संघर्ष च्या मूलाखातीत अभिजीत सांगळे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment