गेल्या दोन दिवसांपासून शोले स्टाईल आंदोलन सुरू असताना प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, या तरुणाचं रात्री देखील हे आंदोलन सुरूच आहे. अशोक माने असं आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
वाहिरा गावातील अशोक माने यांनी मराठा आरक्षणासह वाहिरा गावातील रस्ता आणि विविध समस्या बाबत कालपासून टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या एक वर्षापासून जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांना विविध समस्यांचे निवेदन देऊनही त्याची कोणतीच दखल घेतली नाही. त्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील मार्गी लागत नाही. यामुळे अशोक माने या तरुणाने संतप्त होत, शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासनातील कोणताच अधिकारी माझ्याकडे अध्याप आला आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. मात्र त्यांनी देखील आंदोलनाची दखल घेतली नाही. यामुळे आता मी जर काही केलं, तर याला राज्याचे मुख्यमंत्री आणि बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ या जबाबदार असतील. असा संतप्त आणि टोकाचा इशारा शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या अशोक माने यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment