बीड जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. या भरतीसाठी परीक्षा व इतर सर्व जबाबदारी आयबीपीएस या कंपनीकडे दिली आहे. जिल्हा परिषदेतील रिक्त पदांबाबत शासनाला माहिती कळविल्यानंतर या मेगा भरतीचा निर्णय झाला असून २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत होती. त्यानुसार रिक्त जागांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
रिक्त पदांच्या तुलनेत ३८ पट अर्ज
सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या ५६८ पदांसाठी सुमारे २१ हजार १३१ इच्छुक तरुणांनी नोकरीच्या आशेने अर्ज केले आहेत. जागांच्या तुलनेत प्राप्त अर्जाची संख्या पाहता हे प्रमाण जवळपास ३८ पट इतके आहे. दरम्यान यावरून बेरोजगारीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
No comments:
Post a Comment