जवळपास गेल्या २ महिन्यांपासून बीड जिल्ह्यात पाऊस नाही. यामुळे जिल्ह्यातील धरणे कोरडे पडत आहेत. तर नद्या आजही ओस पडलेल्या आहेत. यामुळे पुढील काही दिवसात पाऊस पडला नाही तर मोठं पाणी संकट बीड जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. मुळात बीड. लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बीडच्या केज तालुक्यातील धनेगावच्या मांजरा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचं समोर आलं आहे.
धरणात २३.९८ टक्के पाणीसाठा
मांजरा धरणात गेल्या ३ दिवसांपूर्वी २४.४८ टक्के असणारा पाणीसाठा आज घडीला २३.९८ टक्क्यांवर आला असून अवघ्या ३ दिवसात तब्बल .५४ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे भर पावसाळ्यात पाणीसाठा कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असून बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट ओढवण्याचं चित्र निर्माण झाले आहे.
No comments:
Post a Comment