नांदेड (प्रतिनिधी) नांदेड ते हैदराबाद राज्य महामार्गावर असलेल्या मौजे कुष्णूर बस स्टँड जवळ कर्नाटकसह बिदर येथून विना पावतीचा ट्रक अवैध तांदूळ घेऊन जात असताना नायगावच्या महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह कुंटूर पोलीस पकडला असून सदरच ट्रक हा गुजरात राज्यात अवैध रित्या तांदुळ घेऊन जातं होता सदरच्या ट्रक चालकाकडे कसल्याची प्रकारची अधिकृत पावती नसल्याचे दिसून आले असून सदरचा तांदूळ हा ट्रकने काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी नेण्यात येत होता असे चालकाच्या बोलण्या वरून समजते आहे
कर्नाटक राज्यातुन व बिदर जिल्ह्यातुन सदरचा ट्रक क्रमांक जि, जे,३६, टी ९३२५ क्रमांकाचा ट्रक चालक रफिकभाई साखरखान समा यांनी सदरचा अवैध तांदूळ गुजरातकडे घेऊन जात असताना कृष्णुर पकडला असल्यामुळे नायागांवचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या आदेशानुसार पेस्कर लक्ष्मणराव टेकाळे व तहसीलचे कर्मचारी इनसभाई यांनी ट्रकची चौकशी केली सदरचा ट्रक बराचा राज्य महामार्गावर थांबून होता आणि या ट्रक मध्ये एकूण तीस टन अवैध तांदूळ असल्याचे दिसून आले असून सदरचा तांदूळ हा कर्नाटक रायचुरी येथून भरण्यासात आल्याचे चालकांनी सांगितले आहे
नायागांवचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या आदेशानुसार महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी कळकेकर यांनी सदर घटनेतील अवैध ? तीस टन तांदूळ घेऊन गुजरात राज्यात ट्रकची पाहणी करुन पंचनामा केला असून सदरची कारवाई ही कुंटूर पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यानी केली असून हा तांदळाने भरलेला ट्रक हा कारवाई करण्याच्या संदर्भात कुंटूर पोलिस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पॉका कंधारे, जिप चालक रामेश्वर पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले आहे
No comments:
Post a Comment