मुंबई (प्रतिनीधी ) राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन तर भाजपनेही तीन जागा जिंकल्या. आज झालेल्या मतदानानंतर दोन्ही बाजूंनी पाच जणांच्या मतपत्रिकेवर आक्षेप घेतल्यानंतर तब्बल नऊ तासानंतर या निवडणुकीच्या मतमोजणीला रात्री दोनला सुरुवात झाली.त्यानंतर चार वाजता सर्व निकाल समोर आले आहे. पहिले मतपत्रिकेची छाननी झाली. त्यात २८४ मतपत्रिका वैध ठरल्या. त्यातून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येकी एक असे एकुण महाविकास आघाडीचे तीन तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत पहिल्या फेरीत पाच उमेदवार निवडून आले. त्यात
संजय राऊत ( शिवसेना) - ४१ ( विजयी )
प्रफुल्ल पटेल( राष्ट्रवादी ) - ४३ ( विजयी )
इम्रान प्रतापगढी ( काँग्रेस ) - ४४ ( विजयी )
पियुष गोयल ( भाजप ) - ४८ ( विजयी )
अनिल बोंडे ( भाजप ) - ४८ (विजयी)
यांचा समावेश आहे. या पहिल्या फेरीत
संजय पवार( शिवसेना) - ३३ व धनजंय महाडिक ( भाजप ) - २६ यांंना मिळाले. पण, दुस-या पसंतीच्या मताचा महाडिक यांना फायदा झाला त्यात त्यांना ४१ मते मिळाली तर शिवसेनेचे संजय पवार हे पराभूत झाले.
No comments:
Post a Comment