Saturday, June 11, 2022

शेतकरी आत्महत्याप्रकरणी अंतिम अहवालास विलंब;जिल्हाधिका-यांनी १० पोलीस निरीक्षकांना बजावल्या नोटीस.गळफास आंदोलनाचे यश :-डाॅ.गणेश ढवळे.

______
शेतकरी आत्महत्याप्रकरणात कुटुंबियास शासकीय मदत मिळण्यास विलंब होत असून शासनाच्या ऊदासीन धोरणाच्या निषेधार्थ दि.३० मे २०२२ रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शेख युनुस च-हाटकर,मुक्तपत्रकार एस.एम.युसुफभाई,बाळासाहेब मोरे,मोहम्मद मोईज्जोदीन,सय्यद आबेद,शेख मुबीन,सुदाम तांदळे,बलभीम उबाळे,सुभाष बांगर,विजय कवडे आदिंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गळफास आंदोलनानंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी 
वैद्यकीय आधिका-यांचा अंतिम अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सुचना देऊनही अहवाल सादर न केल्याबद्दल १० पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून दोन दिवसात नोटीसांना उत्तर द्यावे अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा ईशारा दिला आहे. 

 बीड जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना दिल्या जाणा-या आर्थिक मदतीची प्रकरणे निकाली काढण्यास व्हिसेरा रिपोर्ट अडथळा ठरत असून व्हिसेरा रिपोर्ट न मिळाल्यामुळे पोलीसांकडून अंतिम अहवाल येण्यास विलंब होत आहे. 

जिल्हाधिका-यांनी १० पोलीस ठाणे प्रमुखांना शिस्तभंगाच्या कारवाईचा ईशारा दिला 
____
शेतकरी आत्महत्या सारख्या संवेदनशील कामांकडे दुर्लक्ष केल्याची बाब निदर्शनास आली असुन प्रलंबित अहवाल सादर करण्यास होणारा विलंबाचा नोटीस मिळाल्यापासून २ दिवसात लेखी खुलासा करावा अन्यथा आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून आपणाविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये नमुद केले आहे. 

जिल्हाधिका-याची १० ठाणेदारांना नोटीस 
___
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड,अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर, गेवराई,तलवाडा,नेकनुर,अंबाजोगाई ग्रामीण,धारूर,वडवणी,पिंपळनेर,   माजलगाव ग्रामीण ,या १० ठाणेप्रमुखांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. 

No comments:

Post a Comment