परळी वैजनाथ (प्रतिनिधी) संगम (ता. परळी) परळी जवळील संगम येथे स्वर्गीय चिरंजीव अक्षय तुकाराम मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ श्रीमद् भागवतकथाचे आयोजन करण्यात आले आज चौथा दिवस कथेचा संपन्न झाला कथेमध्ये श्रीकृष्ण भगवान यांचा जन्म झाला कथेमध्ये जिवंत देखावा करण्यात आला मनमोहक कृष्णाच्या रूपाने संगमकर भारावून गेले
सुरू असलेल्या श्रीमद्भागवत कथेच्या चौथ्या दिवसाचा कार्यक्रम आज गुरुवार दिमाखात पार पडला. या प्रसंगी प्रमुख भागवताचार्य ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे (संगमकर) यांनी आपल्या ओजस्वी वाणीतील कथेच्या माध्यमातून समाजातील ऐक्य, सद्भावना आणि परस्पर स्नेहाचे महत्व पटवून दिले.
आपल्या कथेत मध्ये जनाई महाराज म्हणाल्या – “समाजातील ऐक्य हीच खरी शक्ती आहे. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या समुद्रात एकवटतात, त्याप्रमाणे सर्व समाजघटकांनी आपले भेद विसरून भक्तीमार्गावर चालले पाहिजे. ईश्वरभक्तीमुळे मनात प्रेम, करुणा आणि क्षमा जागृत होते आणि त्यातूनच समाज सुदृढ होतो असे त्या म्हणाल्या
कथेच्यावेळी भाविकांची लक्षणीयगर्दी उसळली होती. महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय ठरला. भजन-गायनात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिंतवादक जनक महाराज कदम पहाडी आवाजामध्ये श्रीकृष्णाचे गीत म्हणून उपस्थित सर्व त्यांच्या मनामध्ये आपण वृंदावन मध्ये आहोत असं वातावरण बनवलं पॅडवादक विनोद चव्हाण नांदेड जवळील उंचाडागाव व तबला साथ अशोक महाराज कराळे तर टाळ साथ श्रावणी कोकाटे-मृदंग साथ आनंदी कोकाटे उपस्थित श्रोत्यांना संगिताने निनाद घुमवत वातावरण भारावून टाकले. मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण कथेत एकरूप झाला होता.
गावात आलेल्या अनेक भक्तांनी सांगितले की, जनाई महाराजांची कथा ऐकतांना कधी डोळ्यातून अश्रू तर कधी चेहऱ्यावर हसू प्रत्येक श्रोत्यांच्या मनात प्रसन्नता दिसू लागली आणि भक्तीचा उत्साह जाणवतो. कार्यक्रमामुळे श्री हनुमान मंदिर परिसरात दिवसभर भक्तिरसाचे वातावरण निर्माण झाले.
भागवत कथेच्या चौथ्या दिवसाबद्दल ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, भाविकांची उपस्थिती अधिकाधिक वाढेल, असा विश्वास दत्तात्रय पंढरीनाथ मुंडे ज्ञानोबा पंढरीनाथ मुंडे तुकाराम पंढरीनाथ मुंडे अर्जुन पंढरीनाथ मुंडे व समस्त ग्रामस्थ संगम आयोजकांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment