परळी (प्रतिनिधी):- परळी विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकावर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्याचे काम पोलीस प्रशासनाला दबावाखाली घेत सुरू आहे. येथील प्रशासन राजकीय लोकांचे बटीक झाले आहे. परळी विधानसभा मतदारसंघात प्रतिष्ठित नागरिकावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व घटनांची तत्काळ दाखल संबंधितांनी घ्यावी. अन्यथा अन्याय- अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कायदेशीर मार्गाने तीव्र अंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास पोलीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समिती परळीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
याबाबत उपविभागीय अधिकारी परळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी शहर व मतदार संघातील सामाजिक, राजकीय, प्रतिष्ठीत लोकांवरती कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता खोटे गुन्हे दाखल होत आहेत. यामुळे अशा दाखल होत असलेल्या गुन्हयामुळे शहरात व मतदार संघात दहशतीचे व भितीचे वातावरण तयार झाले आहे. मतदार संघात लोकशाही कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असे वाटू लागले आहे. पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत आहे. खोटे गुन्हे दाखल करून घेत आहे. या अगोदरही कॉ. पी.एस. घाडगे, दत्ताप्पा ईटके, जुगलकिशोर लोहिया, करुणा मुंडे, बबनराव गित्ते, देवराव लुगडे, अशा अनेक व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मतदानाच्या दिवशी उमेदवार राजेसाहेब देशमुख व अॅड. माधवराव जाधव यांना पोलिसासमोर धक्का बुकी व मारहाण करण्यात आली. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला गेला नाही.
डॉ.यशवंत देशमुख यांच्यावरील अॅट्रोसिटी व विनयभंग हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा पूर्वनियोजित कटाचा भाग असूनही पोलीस प्रशासनाणे सखोल चौकशी न करता गुन्हा नोंद केला. फिर्यादी मुलीला गुन्हा दाखल करण्यासाठी कोणी पठवले या बाबीची चौकशी मुलीला अटक करुन करावी व सत्य बाहेर काढावे जेणे करून पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत. प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्न उभे राहत आहेत. पोलिसांचे कर्तव्य सदरक्षणाय खलनिग्रहनाय आहे. दुष्ठांचा संहार व चांगल्याना संरक्षण हे असून परळी मतदार संघात उलट परिस्थिती पहावयास मिळत आहे. अशा सर्व घटना पोलीस प्रशासनाच्या कार्यावर प्रश्न निर्माण करतात. या सर्व घटनांची तत्काळ दाखल घ्यावी. अन्यथा अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समिती कायदेशीर मार्गाने तीव्र अंदोलन करेल यांची नोंद घ्यावी व होणाऱ्या परिणामास पोलीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील. असेही या निवेदनात म्हटले आहे.
सदरील निवेदनावर राजेसाहेब देशमुख, उत्तम माने, सय्यद हनिफ सय्यद करीम उर्फ बहादुर भाई, बालाजी काळे, ऍड.सतीश देशमुख, बाजीराव देशमुख राजेद्र पाटील, विश्वनाथ गायकवाड ,दत्ता गव्हाणे, वृक्षराज काळे, सुनील मस्के, पृथ्वीराज उंबरे, विश्वंभर मोरे, संदीपान काळे, विष्णु पतंगे, विजय देशमुख, गजानन नाईकवाडे, शाम देशमुख, दिपक सिरसाट , बाळासाहेब देशमुख, सुनील देशमुख,डिंगाबर कागले, देशमुख रविंद्र, संतोष साबळे, रमेश सोळंके, सिद्दिकी ऐतेशाम सर , शंकर शेजुळ, सोमनाथ भोसले, राजेंद्र पाटील, रंजित देशमुख, माणिक साबळे, अभिजीत देशमुख, हसन खान , आशोक शिंदे , संदीपान काळे , संदिप चौंडे ,आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
*यांना दिले निवेदन*
मा. जिल्हाअधिकारी बीड, मा. उपविभागीय अधिकारी परळी वै., मा. तहसीलदार परळी वै., मा.पोलीस उपाधीक्षक अंबाजोगाई, शहर पोलीस ठाणे परळी यांना सदरील निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment