मित्राची पुणे येथे पोलीस मध्ये निवड झाल्यामुळे आनंदासाठी स्नेही भोजनाचे आयोजन केले होते. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कारेपूर या गावचे मित्र दि. 9 डिसेंबर सोमवारी रात्री जेवणासाठी मांजरसुंबा (जिल्हा बीड) जवळ गेले होते. तेथे जेवण करून पहाटे मांजरसुंबा येथील ब्रिज खाली शेकोटी करून चार वाजता स्विफ्ट कार क्रमांक एम एच १४, एल एल ६७४९ मांजरसुंबा येथून निघून पुढे अंबासाखर कारखाना मार्गे रेणापूरकडे महामार्गाने जात असताना अंबासाखर कारखाना जवळ समोरून येणाऱ्या ट्रकला समोरासमोर शिफ्ट कारची धडक झाल्यामुळे कारचा चुराडा होत शिफ्ट कार मधील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला झाला. यात मयत 1) बालाजी शंकर माने वय 27, 2)फारुख बाबुमिंया शेख वय 30, 3)दिपक दिलीप सावरे वय 28 , 4) ऋतवीक गायकवाड (रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू) यातील जख्मी 1) मुबारक शेख, 2) अजिम पाशुभाई शेख 30 वय (पोलीस निवड) स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामा पडवळ पोलीस कर्मचारी नाना राऊत व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान हा महामार्गवर आजपर्यंत अनेक अपघात झाले असून या महामार्ग चौपदरी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment