बीड (प्रतिनिधी) मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्र यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घसरण झाली आहे. उत्तर भारतातील होत असलेल्या बर्फ वृष्टीआणि अति शितलहरी वाऱ्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. मराठवाड्यात सोमवारी ( दि.१६) रोजी बीड जिल्हात ही हिवाळ्यातील सर्वात नीचांक तापमानाची नोंद झाली.
मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्र येथून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, मागील काही दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घट झाली असून त्यामुळे खोकला,सर्दी, तापाच्या रुग्णत वाढ देखील दिसून येतं आहे.
No comments:
Post a Comment