Tuesday, December 10, 2024

परळी शहरातील व्यापारी अमोल विकास डुबे यांचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण.चार लाख रोख आणि दहा तोळे सोने घेऊन सुटका. पोलिसात गुन्हा दाखल


परळी ( प्रतिनिधी)-केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंचांच्या हत्येला बारा तास होतं नाहीत तोच एक खळबळजनक घटना परळीतून समोर आली आहे. शहरातील व्यापारी अमोल विकास डुबे यांचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. अंबाजोगाई -परळी रस्त्यावरील घाटात त्यांच्याकडून चार लाख रोख आणि दहा तोळे सोने घेऊन त्यांना सोडून देण्यात आले.

परळीचे माजी नगराध्यक्ष व पेट्रोल पंपाचे मालक विकास डुबे यांचे चिरंजीव व परळीच्या औद्योगिक वसाहती मध्ये बॅटरीचा व्यवसाय करणारे नामांकित व्यापारी अमोल विकास डुबे हे काल रात्री आपला व्यवसाय बंद करून घरा कडे निघालेले असता या परिसरात स्विफ्ट कार मध्ये दबा धरून बसलेल्या काही अज्ञात आरोपीने अमोल डूबे यास गाठून मारहाण केली आणि स्विफ्ट कार मध्ये घालून अंबाजोगाईच्या दिशेने घाटात नेऊन अमोल ला घरी कॉल करायला लावला व आरोपीने 2 कोटी रुपयांची मागणी केली.

यावेळी त्यांच्या घरच्यांनी काही रक्कम पोच केल्या नंतर अमोलची सुटका करण्यात आली.

केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्की प्रकरणातून हत्या करण्यात आली. या घटनेतील दोन आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सुरु असतानाच परळीत व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपीच्या शोधासाठी दोन पथक रवाना करण्यात आली आहेत.



No comments:

Post a Comment