Tuesday, December 17, 2024

मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डाव ल्याने.छगन भुजबळ समर्थक आक्रमक, अजित पवारांच्या प्रतिमेला मारले जोडे


जालना (प्रतिनिधी) शपथविधीमध्ये मोठ्या प्रमाणात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने जुने व वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत. त्यात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बड्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी न दिल्याने आता उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ही नाराजी बोलून देखील दाखवली. परिणामी त्याचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटायला सुरुवात झाली असल्याचे बघायला मिळाले आहे.

मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावल्याचा निषेध व्यक्त करत जालन्यात भुजबळ समर्थक आणि ओबीसी आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी शहरातील गांधी चमन येथे जोडे मारो आंदोलन केलंय. यावेळी या आंदोलकांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. दरम्यान मंत्रिमंडळात समावेश न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी आंदोलकांनी दिलाय.

No comments:

Post a Comment