Sunday, December 29, 2024

मा.खा.सतिश प्रधान यांचे दुःखद निधन त्यांचे कार्य शिवसेनेच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील.परळी शिवसेनेच्या वतीने श्रृध्दांजली - अभयकुमार ठक्कर.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - शिवसेना नेते आणि माजी खासदार मा.सतिश प्रधान यांचे आज रविवारी दुःखद निधन झाले. त्यांना परळी शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मा. नगराध्यक्ष तथा शिवसेना मा.उपजिल्हाप्रमुख श्री. अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. स्व.सतिश प्रधान यांचे कार्य शिवसेनेच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील. सतीश प्रधान यांच्या निधनामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शोक व्यक्त केला गेला असून त्यांच्या कार्याचा ठसा सर्वांवर कायम राहील असे  मा. नगराध्यक्ष तथा शिवसेना मा .उपजिल्हाप्रमुख श्री. अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी सांगितले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी, बीड जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी खासदार सतिश प्रधान यांचे निधन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. त्यांचे योगदान बीड जिल्ह्यात शिवसेनेच्या प्रसार व जनहितासाठी अमूल्य राहील.
यावेळी शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवासेना बीड जिल्हा मा.समन्वयक व जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अतुल दुबे, जेष्ठ नेते रमेशअण्णा चौंडे, शिवसेना माजी उपशहर प्रमुख सतीश जगताप, किशन बुंदेले ,शिवसेना माजी शहर संघटक संजय कुकडे, युवासेना माजी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाने, मनीष जोशी, गणेश जठार, प्रकाश देवकर, अमित कचरे , योगेश जाधव,यांच्यासह अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.
शिवसेना, युवासेना आणि जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यावेळी एकत्र आले आणि माजी खासदार सतिश प्रधान यांच्या कार्याची आठवण मनाशी जपली. त्यांच्या निधनाने शिवसेनेला एक विश्वासू नेता गमवावा लागला आहे, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment