Saturday, December 14, 2024

संविधान प्रतिकृती तोडफोडीच्या निषेधार्था आंबेडकरवादी महिला संघटनांच्या मोर्चाने परळी शहर दणाणले.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी). परभणी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ असणाऱ्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची जातीयवाद्याने तोडफोड केल्याच्या निषेधार्थ परळी शहरातील सर्व आंबेडकरवादी महिला संघटनांच्या वतीने परळी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला.

शहरातील भीमनगर येथून निघालेला हा मोर्चा गणेशपार ,राणी लक्ष्मीबाई टॉवर,मोंढा मार्केट,एकमिनार चौक, बस स्टँड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते परळी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला.मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परभणी येथील संविधान प्रतिकृती तोडफोड करणाऱ्या व्यक्ती वर दोषद्रोहचा गुन्हा दाखल करावा,या घटनेमागील खरा सुत्रधार शोधून त्यावर कारवाई करावी, तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा.

प्रजावतीताई कांबळे व अनिता रोडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.सुत्रसंचलन रंजनाताई मस्के, आभार प्रदर्शन छायाताई रोडे यांनी मानले. या मोर्चात सीमाताई कांबळे, रमाबाई उबाळे, गवळण ताई गोखले, विमलबाई ताटे, विजयमाला आदोडे, सुनिता ताई निवंडे, गवळण बाई वाघमारे, द्वारकाताई रोडे, सुमनबाई सरवदे, पार्वतीबाई वाघमारे, श्रद्धा जगतकर, गोदावरी केदारे, प्रज्ञा तरकसे, अनिता चक्रे, सविता हजारे, संभावना रोडे, सुनंदा हनवते, कल्पना बुक्तर, सानिया कांबळे, वैष्णवी गोदाम, रूपाली कसबे, वंदना गायकवाड, भारती मस्के यांच्यासह हजारो महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment